सोमवार, २७ जून, २०११

अविनाश दुधवड़े , चाकण



चाकण मधे दैनिक पुढारी बातम्या साठी संपर्क करा अविनाश दुधवड़े



९९२२४५७४७५ , ९७६५५६६९०८


टाळ-मृदंगाच्या निनादामध्ये समूहस्वरांत आळविलेले अभंगाचे सूर... वैद्यकीय तपासणीपासून ते खाद्यपदार्थांचे वाटप आणि दाढी-कटिंग करण्यापासून ते चपला-बूट दुरुस्ती या माध्यमातून वारकऱ्यांची केलेली सेवा... शहरातील प्रेक्षणीय स्थळांना वारकऱ्यांनी दिलेली भेट... पालखी आणि माउलींच्या पादुकांचे दर्शन घेण्यासाठी झालेली भाविकांची गर्दी... अशा भक्तिपूर्ण वातावरणाने पुण्यनगरीमध्ये जणू पंढरी अवतरली.आळंदीहून प्रस्थान ठेवलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी शनिवारी रात्री भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरामध्ये विसावली. सव्वादहा वाजता पालखीचे आगमन झाल्यानंतर आरती आणि अभिषेक झाला. पालखी विठोबा मंदिराच्या भजनी मंडळाचा कार्यक्रम सादर झाला. रविवारी पहाटे पाच वाजता आणि रात्री आठ वाजता महापूजा झाली. दुपारी बारा वाजता महाप्रसादाचा नैवेद्य दाखविण्यात आला. मंदिरामध्ये दिवस-रात्र दर्शनाची सोय करण्यात आली आहे. दर्शनाला जात असताना बाळगोपाळांसह त्यांचे पालक आणि ज्येष्ठ नागरिकांनी "गंध माउली'कडून आवर्जून वारकरी पंथाचे गंध लावून घेतले. भाविकांच्या प्रचंड गर्दीमुळे दर्शनासाठी दोन स्वतंत्र रांगा करण्यात आल्या आहेत. प्रमोद बेंगरूट, वसंत कोंढरे, गोरखनाथ भिकुले, तेजेंद्र कोंढरे, अप्पा मानकर या मंदिराच्या विश्‍वस्तांसह कार्यकर्त्यांनी रांगेतील भाविकांच्या दर्शनाची सोय केली. बॅंडपथकाने आरती, अभंग आणि भजनाच्या सुरावटी सादर करून माउलींच्या चरणी आपली सेवा रुजू केली. सोमवारी (ता. 27) माउलींच्या पालखीची पहाटे पाच वाजता महापूजा होणार असून त्यानंतर पालखी बंधू सोपानदेवांच्या नगरीकडे प्रस्थान ठेवणार आहे. हडपसर येथे विसावा घेतल्यानंतर दिवेघाटमार्गे पालखी सासवड येथे जाणार आहे. पालखी मार्गाकडे जाताना अभंग गात असलेला संतशिरोमणी तुकाराम महाराजांचा पुतळा पाहून भाविकांचे हात नमस्कारासाठी नकळतपणे जोडले गेले. रस्त्याच्या दोन्ही बाजूला बालचमूंना आकर्षित करणाऱ्या खेळण्यांची दुकाने थाटली होती. महिलांसाठी बांगड्या, मेंदी आणि रांगोळीचे छाप त्याचप्रमाणे गृहोपयोगी वस्तूंची दुकाने, तर भाविकांसाठी देवदेवतांच्या प्रतिमा असलेली छोटेखानी दुकाने होती. विविध स्वयंसेवी संस्थांतर्फे वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. गणेश मंडळांतर्फे चहा-नाश्‍ता आणि सुग्रास भोजनाचा आस्वाद देत वारकऱ्यांच्या चरणी सेवा रुजू करण्यात आली. चपला-बूट दुरुस्तीबरोबरच दाढी-कटिंग या सेवादेखील देण्यात आल्या.वारी नियंत्रणासाठी वॉकीटॉकीचा वापरसंत ज्ञानेश्‍वर महाराज देवस्थानचे प्रमुख विश्‍वस्त डॉ. प्रशांत सुरू म्हणाले, ""वारीमध्ये विविध स्वयंसेवी संस्था आणि मंडळांतर्फे वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सेवा दिली जाते. त्याचबरोबरीने देवस्थाननेदेखील आपल्या वैद्यकीय सुविधेमध्ये सुसूत्रता आणण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात त्याची गरज कोणालाही पडू नये, अशीच माउलींच्या चरणी प्रार्थना आहे. वारी सुरू झाल्यावर तिचा शेवट हा साधारणपणे चार किलोमीटरचा मार्ग असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी 16 वॉकीटॉकीचा उपयोग यंदा प्रथमच करण्यात आला आहे. संस्थानच्या वाहनांचा वारकऱ्यांना त्रास होणार नाही याची दक्षता घेतली आहे.''

शुक्रवार, २४ जून, २०११

माझ्या मित्रांना पुस्तके मिळाली मला का नाही?



आमच्या दुसऱ्या वर्गातील मित्रांना नवी पुस्तके मिळाली, पण मला एकही पुस्तक मिळाले नाही. आमचा अभ्यास सुरू झाला आहे, आम्ही कोणत्या पुस्तकातून अभ्यास करायचा?, असे प्रश्‍न आता विद्यार्थी त्यांच्या पालकांना विचारून भंडावून सोडत आहेत.शहरासह तालुक्‍यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अद्यापर्यत शालेय पुस्तके पूर्ण मिळाली नाहीत. तर दुसरीकडे आठ दिवसांपूर्वी उघडलेल्या शाळांमध्ये अभ्यासक्रम शिकविणे सुरू झाले आहे. मात्र अपूर्ण पुस्तकांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तालुक्‍यात 161 शाळा असून, 35 हजार 559 पुस्तकांची मागणी शासनाकडे केली होती. मात्र, प्रत्यक्षात 29 हजार 263 पुस्तकेच येथे प्राप्त झाली असून सहा हजार 293 पुस्तके कमी आलेली आहेत.एकूणच मागणीपेक्षा कमी पुस्तके मिळाल्याने ही अडचण निर्माण झाली आहे. तिसरी ते सातवीपर्यंतच्या वर्गातील पुस्तके मोठ्या संख्येने अपूर्ण आहेत. त्यामुळे बाजूच्या मित्राला नवे पुस्तके तर आपल्याला पुस्तक का नाही? अशी भावना विद्यार्थ्यांमधून व्यक्त करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने याविषयी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

खरडलेले साहित्य वाचायला वेळ आहे



माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगातही मराठी साहित्य संमेलने "मुद्रित माध्यमांतील लेखन म्हणजेच साहित्य' या समीकरणातून अद्याप बाहेर आलेली नाहीत. माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने माध्यमे विविधांगी झाली असून, त्यामुळे लेखनासाठी नवनवीन व्यासपीठे उपलब्ध झाली आहेत. त्याचा फायदा घेऊन अनेक जण आपली अभिव्यक्ती लेखनाद्वारे व्यक्त करीत आहेत. मात्र याची दखल संमेलनांनी घेतलेली नाही. शिक्षणाचे माहेरघर म्हणविणाऱ्या पुण्यातील संमेलनानेही या नवमाध्यमांतील लेखनाकडे पाठ फिरविली आहे."मुद्रित होऊन पुस्तकरूपाने प्रसिद्ध होते, तेच साहित्य' अशी साहित्य संमेलनांची आजपर्यंतची वाटचाल आहे. वास्तविक गेल्या दहा-बारा वर्षांत शहरांमध्ये इंटरनेट माध्यमाचा वापर दिवसेंदिवस वाढतो आहे. त्यावर मराठीतून लेखन करणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. विशेषतः ब्लॉगच्या रूपाने अनुभव, कथा, कविता, ललित आदी विविध प्रकारचे लेखन करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. एकट्या पुणे शहरातून सुमारे 15 हजार मराठी ब्लॉग लिहिले जातात. मुंबईतही जवळपास हीच स्थिती आहे. या लेखनाची दखल साहित्य संमेलनानेही घेतली पाहिजे, अशी अपेक्षा काही "ब्लॉगर्स'नी "सकाळ'कडे व्यक्त केली. ""मी व्यवसायाने सॉफ्टवेअर इंजिनिअर. मराठीतून ब्लॉगिंग करतो आणि एका वर्षात माझा ब्लॉग एक लाख लोकांपर्यंत पोचला,'' असे पुण्याचा ब्लॉगर अनिकेत समुद्रे याने सांगितले. ""लेखन करू इच्छिणाऱ्यांना "ब्लॉग' हे अतिशय चांगले माध्यम आहे. मी कथा लिहितो. या छापून प्रकाशित करणे मला आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही; पण ब्लॉगमुळे त्या कथा मला प्रसिद्ध करता येतात. त्यांना वाचकांचा चांगला प्रतिसादही मिळतो,'' हा अनुभव अनिकेतने नमूद केला. मुंबईच्या ब्लॉगर सोनल वायकुळ म्हणाल्या, "फक्त छापील पुस्तकरूपातील लेखन म्हणजे साहित्य हा नियम आता बदलला पाहिजे. "कोणत्याही माध्यमातील लेखन म्हणजे साहित्य' अशी व्यापक भूमिका साहित्य संमेलनाने घेतली पाहिजे. सर्व माध्यमांतील मराठी साहित्यासाठी मध्यवर्ती व्यासपीठ, असे रूप साहित्य संमेलनाला देता येऊ शकेल. नव्या ब्लॉगर्सना साहित्यिकांच्या अनुभवांचा, त्यांच्या लिखाणातील शैलीचा फायदा होऊ शकेल.''फलटणमधील चैतन्य रुद्रभाटे याच्यासारख्या ब्लॉगर्सना याची उपयुक्तता निश्‍चितच पटते. चैतन्य इयत्ता बारावीत शिकतो आणि गेले वर्षभर ब्लॉगिंग करतो आहे. ""मला लिहायला आवडते, म्हणून ब्लॉग लिहितो,'' असे सांगणारा चैतन्य त्याच्या गावातील घडामोडींवरच फक्त ब्लॉगवर लिहितो.दरम्यान, या ब्लॉगर्सची आणि ऑनलाईन माध्यमातील मराठीची दखल साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळावर घेतली असल्याचे पुण्याच्या संमेलनाच्या संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी व्यवस्थापक आणि साहित्यिक संजय जोशी यांनी सांगितले. ते म्हणाले, ""संकेतस्थळाला मिळालेला प्रतिसाद भरपूर आहे. ऑनलाईन वाचकांनी आवर्जून प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. "ई प्रतिमेचा आविष्कार' या स्पर्धेलाही छान प्रतिसाद होता. संमेलनपूर्व कार्यक्रमात मराठी ब्लॉगिंगविषयी चर्चा घडविली होती.''साहित्य संमेलनाचे अध्यक्ष द. भि. कुलकर्णी यांची काही दिवसांपूर्वी मराठी ब्लॉगर्सशी भेट झाली. संमेलनपूर्व परिसंवादातही ब्लॉगविषयी चर्चा झाली. स्वतः द. भि. संमेलनाच्या संकेतस्थळासाठी खास ब्लॉग लिहीत आहेत. मुद्रित माध्यमाच्या भौगोलिकतेच्या मर्यादा ओलांडणाऱ्या "ऑनलाईन माध्यमा'ची दखल संमेलनाध्यक्षांच्या भाषणातही यावी, ही "ऑनलाइन' मराठी समुदायाची अपेक्षा आहे.

वीणाला मिळाला चित्रपट

बॉलिवूडमध्ये स्थान मिळावं यासाठी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकनं काय काय उद्योग केले, हे आता वेगळं सांगायची गरज नाही. सध्या नवीन चित्रपट पटकावण्यासाठी अनेक नायिका स्टंटबाजी करताना दिसून येतात. यात पहिला नंबर वीणानं लावला होता. पण तरीदेखील तिला एकही महत्त्वाचा चित्रपट मिळाला नव्हता. परंतु, बऱ्याच प्रतिक्षेनंतर तिला एक नवीन चित्रपट मिळालाय. निर्माते आनंद बलराज यांनी "दालमें कुछ काला है' या चित्रपटात अखेर वीणाची वर्णी लावलीय. या चित्रपटात वीणासोबत अजून कोणाला घ्यायचं याबाबत निर्णय झाला नसला तरी पदरी चित्रपट पडल्यानं वीणा भलतीच खूश आहे